पातूर प्रतिनिधी—-दैनिक देशन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे यांनी डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय,पातूर (जि.अकोला) येथे सदिच्छा भेट दिली असता महाविद्यालयाच्या विकासकामांची पाहणी केली.

या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे संचालक डॉ.साजिद शेख,जनसंपर्क अधिकारी धनंजय मिश्रा,तसेच फरहान अमीन, रमेशभाऊ पोहरे,कार्यालय अधीक्षक संतोष सोमानी सह आदी मान्यवर उपस्थित होते.महाविद्यालय प्रशासनाने शैक्षणिक,वैद्यकीय व सामाजिक उपक्रमांची माहिती श्री.प्रकाश भाऊ पोहरे यांना दिली.यावेळी आमदार डॉ.राहुल पाटील साहेब यांच्या वतीने श्री.प्रकाश भाऊ पोहरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर प्रकाश भाऊ पोहरे यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त म्हणाले की,“आयुर्वेद हा आपल्या भारतीय परंपरेचा वारसा असून आजच्या काळात आरोग्य संवर्धनासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे.आधुनिक जीवनशैलीतील आजारांवर मात करण्यासाठी आयुर्वेदच खरे औषध आहे.”तसेच,आयुर्वेदिक उपचारपद्धतीला महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJY) मध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.लवकरच केंद्रीय आयुष मंत्री यांची भेट घेऊन या संदर्भातील सविस्तर माहिती देण्याचेही त्यांनी सांगितले.या भेटीनंतर महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांनी श्री.प्रकाश भाऊ पोहरे यांच्या विचारांचे स्वागत केले व भविष्यात आयुर्वेद क्षेत्राला नवे बळ मिळेल,असा विश्वास व्यक्त केला.