विद्यार्थ्यांनी घेतला खऱ्याखुऱ्या निवडणुकीचा आनंद
पातूर : विद्यार्थ्यांना लोकशाहीची संपूर्ण प्रक्रिया समजावी यासाठी पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे ईव्हीएम द्वारे मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली.या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी एकच जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला.मतदानाची प्रक्रिया समजावी म्हणून दरवर्षी पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे निवडणूक प्रक्रिया पार पडत असते यावर्षी ही निवडणूक ईव्हीएम द्वारे घेत विद्यार्थ्यांना खऱ्याखुऱ्या निवडणुकीचा आनंद घेता आला ही निवडणूक प्रक्रिया राबवताना आचारसंहिता नामांकन अर्ज दाखल करणे अर्ज मागे घेणे प्रचार यासारखे मतदार प्रक्रियेतील सर्व बाबी राबविण्यात आल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदानाची संपूर्ण प्रक्रिया या उपक्रमाद्वारे समजावून सांगण्यात आली.

या मतदान प्रक्रियेत प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी असे निवडून आले.विजयी झालेल्या उमेदवारांचे स्वागत सहदेराव भोपळे महाविद्यालयाचे संचालक प्रा.कौस्तुभ भोपळे,प्रा. विलास राऊत,किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे, आकाश बोचरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी निवडणूक निकाल शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे यांनी घोषित केला.तर निवडणूक प्रक्रिया संयोजक म्हणून नितु ढोणे यांनी काम पाहिले.या निवडणुकीत हिंदवी बोचरे,मानस शेंडे, वीरा बारताशे,स्पंदन गाडगे,कनिष्का खंडारे,गीत येवले, आयरा खान,प्रज्वल कांबळे,श्राव्या गवई,संग्राम इंगळे,रिद्धी उगले,ओम फाटकर,मनस्वी सपकाळ,श्रीजन जटाळे,दिव्या बंड,अजहफ खान,नमिषा सुगंधी,रितेश घुगे,सलोनी खोडे, अंकित पाटील आदी विद्यार्थ्यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली.यावेळी पोलिस बंदोबस्त सानवी पाटील हिने चोख पणे बाजवला.केंद्राध्यक्ष म्हणून धनश्री राऊत,गौरी गाडगे,अंतरा अंभोरे यांनी तर मतदान अधिकारी म्हणून प्रणव कांबळे,साहिल पवार,अभिग्यान पवार,आदित्य बंड,ओम सावंत,संकल्प गाडगे,सार्थक शेंडे,युवराज बंड,रोहन इंगळे, गुरुनाथ भुजबटराव,प्रणव बगाडे,श्रेयश हिरळकार आदीं विद्यार्थ्यांनी काम पाहिले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे,नरेंद्र बोरकर, नितु ढोणे, संकल्प व्यवहारे, हरिष सौंदळे,बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, अक्षय तायडे, प्रतीक्षा भारसाकळे,प्रियंका चव्हाण,पूजा खंडारे,रेश्मा शेंडे,इकरा आदिबा खान,साक्षी वानखडे,शुभांगी बोरकर,दिव्या गव्हाळे,नयना पटोणे,प्रिया चक्रे,गौरी अमानकर,रुपाली पोहरे,कल्पना वानेरे,शुभम पोहरे, आदींनी परिश्रम घेतले.