खामखेड ता.पातुर
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत श्रीमती. सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिरला अंधारे. येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खामखेड येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे फायदे काय ? माती परीक्षण करण्याची योग्य पद्धत कोणती ? व त्यानी आपल्याला कसा फायदा होईल? याबद्दलची सर्व माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की जर आपण आपल्या मातीचे परीक्षण केले तर आपल्याला आधीच कळणार की आपल्या मातीमध्ये कुठले पोषक द्रव्ये किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. व नंतर त्यानुसार आपण आपल्या मातीमध्ये कमी असलेले व मातीला गरज असलेले पोषक द्रव्य खताद्वारे उपलब्ध करून देऊ शकतो. याचा नक्कीच आपल्या उत्पादनाला चांगला फायदा होईल. शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना याबद्दल त्यांचे प्रश्न विचारले व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. आदित्य गालट, अनिल ठाकरे, अभिजित खंडारे, रामेश्वर ठाकरे व इतर शेतकरी उपस्थित होते. याकरिता कृषीदूत उदय घनबहादुर, एकांत गोंदोळे, संकेत कदम, साहिल नन्नावरे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खर्डे सर कार्यक्रम अधिकारी प्रा.शिवकुमार राठोड सर,प्रा.श्रद्धा चव्हाण मॅडम कार्यक्रम समन्वयक प्रा.सागर भगत सर ,प्रा.पांडुरंग जाधव सर व विषय तज्ञ प्रा. एच. एस. पोरे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
