पातुर व बाळापूर तालुक्यातील कागदी लिंबू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची कार्यशाळा बाबतचे आयोजन हिगना येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दोन्ही तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकरी यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क( मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर जिल्हा अमरावती व अथर्व निंबू उत्पादक व प्रक्रिया शेतकरी गट हिंगणा यांच्या संयुक्त वतीने शेतकऱ्यांना लिंबू व्यवस्थापन विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .

या कार्यशाळेमध्ये उद्यानविद्याचे अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉ दिनेश पैठणकर यांनी बहार व्यवस्थापन खत व पाणी व्यवस्थापन विषयावर, डॉ योगेश इंगळे सहाय्यक प्राध्यापक ,अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प यांनी कीड रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन, प्रवीण वानखेडे यांनी निर्यातदार युनिव्हर्सल एक्सपोर्ट लिंबू मार्केटिंग व निर्यात याविषयी माहिती दिली. निलेश वानखडे यांनी ऍग्रो बिझनेस एक्सपर्ट मॅग्नेट अमरावती व मॅग्नेट प्रकरणाची माहिती सादर केली राहुल घोगरे कार्यक्रम अन्य तंत्र विभाग कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर अमरावती यांनी लिंबू पिकाचे मूल्यवर्धन पदार्थ प्रक्रिया तर प्रफुल्ल महले यांनी लिंबू काढणे शाश्वत तंत्रज्ञान या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले

या कार्यक्रमाला वाडेगाव येथील सचिन कोकाटे, दादाराव मानकर ,अजय भाऊ भुस्कटे, योगेश लोणकर, अनंता मानकर प्रकाश कांडरकर दिग्रस येथील राजेंद्र ताले, शशिकांत डांगे, पातुर प्रदीप काळपांडे डॉक्टर सुनील आवटे, विवरा डॉ बंड, देविदास धोत्रे , विनोद क्षीरसागर, मुकेश खेकडे हिंगणा येथील नितीन उजाळे , दीपक उजाळे ,प्रकाश सदाशिव उजाळे, निलेश उजाडे, श्रीकृष्ण उजाडे सह शेकडो शेतकऱ्यांनी या लिंबूवर्गीय प्रशिक्षणाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे आयोजन अथर्व लिंबू उत्पादक व प्रक्रिया शेतकरी गट यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल महल्ले यांनी केले.