पातुर :- तालुक्यातील सार्वजनिक मालमत्ता असलेल्या आगीखेड येथील 50 झाडांच्या बुंध्याची साल काढून हळूहळू मारण्याचा प्रयत्न चालू असल्याने याबाबत सरपंच यांनी या घटनेची पातुर पोलीस स्टेशनला तक्रार एक महिना अगोदर दिली असून या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्याने वृक्षप्रेमी यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सविस्तर माहिती अशी आहे की आगीखेड येथील सर्वे नंबर 12 व 13 लागून असलेल्या 50 झाडाचे रविराज वसंतराज बत्तलवार यांनी झाडाच्या बुंध्याची साल काढून त्यांना हळूहळू मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सरपंच गजानन काशीराम टप्पे यांनी केला आहे ही झाडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिपत्याखाली असून या जुन्या झाडांना मारण्याचा प्रयत्न केला

याबाबत गावामध्ये वृक्ष प्रेमींनी तक्रार देऊनही कोणत्या प्रकारची अद्याप पर्यंत कारवाई न झाल्याने वृक्षप्रेमी मध्ये नाराजीचा सूर आहे.एकीकडे झाडे लावा झाडे जगवा या करिता कोट्यावधी खर्च करण्यात येतो परंतु आगीखेड येथे जुनी विशाल काय मोठ्या झाडांना मारण्याकरिता अघोरी शकल लढविण्यात आली आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी या झाडांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यामुळे निसर्गाला मोठी हानी पोहोचत आहे.