पातुर प्रतिनिधी:- तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील खेळाडूंची बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे.क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने,तालुका क्रीडा संकुल पातुर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तुळसाबाई कावल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ते पात्र झाले आहेत.या स्पर्धेमध्ये तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथील खेळाडूंनी तालुकास्तरावर संपन्न झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तुळसाबाई कावल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. त्यामध्ये वयोगट 17 वर्ष कु.ऋतुजा संतोष चव्हाण वर्ग आठवा,वयोगट 14 वर्ष अनुज नंदकिशोर कुटे वर्ग आठवा, खुशी अनिल भगत वर्ग सातवा,आचल सुनील भगत वर्ग सहावा वरील चारही विद्यार्थी विभागीय स्तरावर पातुर तालुक्याचे नेतृत्व करतील.खेळाडूंच्या कार्याचे कौतुक बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक श्री विजयसिंह गहिलोत सचिव सौ स्नेह प्रभादेवी गहिलोत,प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत,उपप्राचार्य एस बी चव्हाण,उपमुख्याध्यापिका आर एस ढेंगे,पर्यवेक्षिका पी एम कारस्कर,पर्यवेक्षक एस आर मुखाडे,क्रीडा शिक्षक डी एम राणे व एस आर खाडे यांनी कौतुक केले.
