उपकार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे..!
पातुर प्रतिनिधी.
येथील टी.के.व्ही.चौक,पातूर ते आगीखेड- खानापूर या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांनी पुन्हा एकदा आज तीव्र भूमिका घेतली.मागील दहा वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार तोंडी व लेखी निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आज रास्ता रोको करण्याचे नियोजन 8 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता केलेले होते.

त्यानुसार टीकेव्ही चौक खानापूर रोड येथे रास्ता रोको करण्यात आला.ह्यापूर्वी १४ जुलै २०२५ रोजी नागरिकांनी दिलेल्या रास्ता रोकोच्या नोटीसीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर पाहणी करून “दहा दिवसात काम सुरू करू” अशी हमी दिली होती.मात्र,आजतागायत कामाला सुरुवात केलीली नव्हती.यामुळे शिक्षक कॉलनी, आदर्श कॉलनी,गजानन नगर,रविंद्र नगर,साईनगर,समता नगर,ढोणे नगर,मुक्ताराम नगर,खानापूर,आगीखेड, अस्टूल,पास्टूल,पार्डी, खामखेड तसेच बार्शिटाकळी तालुक्यातील शेलगांव, बोरमळी,राजनखेड,चेलका,निंबी,जनुना,धाबा,लोहगड आदी गावातील नागरिक त्रस्त झाले होते.या मार्गावरून बाजारपेठ,शाळा,शिकवणी,शेती तसेच दैनंदिन कामांसाठी दररोज ये-जा करावी लागते.मात्र रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असल्याने नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार,जर दि.७ सप्टेंबर २०२५ पर्यंत रस्त्याच्या कामाची सुरूवात न झाल्यास दि.८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता टी.के.व्ही.चौक,पातूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला होता त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवून दिलेल्या वेळेत बांधकामाला सुरुवात केली नसल्याने शेवटी आज दिनांक 8/ 9/ 2025 रोजी सकाळी अकरा वाजता वरील नमूद परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको ला सुरुवात केली होती अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश राठोड व शाखा अभियंता हेमंत राठोड यांनी आंदोलनकर्त्या सोबत चर्चा विनिमय करून संबंधित सिमेंट रोडचे काम तात्काळ करून देण्या संदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामध्ये या परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड,पोलीस उपनिरीक्षक गजानन तडसे साहेब यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.