संस्था नेहमी सुखदुःखात सहभागी असते……….. सचिव स्नेहप्रभादेवी गहीलोत
पातुर प्रतिनिधी :- तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे नुकताच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात आला “संस्था नेहमीच कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी असतेच असे प्रतिपादन निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ स्नेह प्रभादेवी गहिलोत सचिव,बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर यांनी केले.सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका सौ आर एस ढेंगे मॅडम यांनी केले.तुळसाबाई कावल विद्यालय बाभुळगाव येथील प्राचार्य एस बी ठाकरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांनी वयाची 31 वर्ष संस्थेमध्ये सेवा दिली प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले श्री एस बी ठाकरे हे उपप्राचार्य ते प्राचार्य अशा प्रकारचा त्यांचा संस्थेमधील शैक्षणिक क्षेत्रातला प्रवास केला. इंग्रजी विषयाचे ज्ञान देत त्यांनी मुलांना घडविण्याचा प्रयत्न केला.श्री एस बी ठाकरे यांनी कनिष्ठ महाविद्यालयात येऊन,गेली अनेक वर्षे, अत्यंत निष्ठेने आणि समर्पितपणे काम केले आहे.त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले,त्यांचे भविष्य घडवले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले.त्यांनी केलेले कार्य, त्यांचे शिकवण्याचे अनोखे तंत्र,आणि विद्यार्थ्यांशी त्यांचे असलेले नाते,हे नेहमीच स्मरणात राहील.त्यांचे प्रेम,त्यांची आपुलकी,आणि त्यांचा उत्साह,यामुळे शाळेचे वातावरण नेहमीच सकारात्मक राहिले असे मनोगत व्यक्त करताना प्रा.डॉ. इ.एस सुर्वे यांनी केले. हीच सकारात्मक भावना येणाऱ्या काळात पुढील शिक्षकांनी संस्थे प्रती ठेवावी अशी इच्छा सेवानिवृत्त प्राचार्य एस बी ठाकरे यांनी स्वागताचे प्रत्युत्तर देत असताना बोलवून दाखवली.संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री एस बी बोंडे यांनी वयाची 35 वर्ष संस्थेमध्ये सेवा दिलेली आहे.अतिशय शांत,संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर भाऊ बोंडे म्हणून विद्यालयात प्रसिद्ध आहेत. सांगितलेले काम कधीही न कंटाळता पूर्णत्वास कशाप्रकारे नेता येईल याची सचोटी त्यांच्या कार्यात नेहमीच बघायला मिळाली. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी करावा हे एक अनोखे उदाहरण विद्यालयांमध्ये होऊन गेलेले आहे.एक चतुर्थश्रेणी कर्मचारी विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा घर करून दाखवतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री एस बी बोंडे हे आहेत.आज, हे दोन्ही कर्मचारी शाळेतून निवृत्त होत असले तरी,त्यांचे विचार,त्यांचे मार्गदर्शन,आणि त्यांच्या आठवणी,नेहमीच आमच्या मनात,आणि शाळेत जिवंत राहतील.संस्थे प्रति असलेली त्यांची निष्ठा नेहमीच अंत:करणात घर करून राहील.असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजयसिंह गहिलोत व्यवस्थापक,बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर यांनी केले.सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आलात्यांनी केलेल्या सेवेमध्ये एक आठवण म्हणून शाळेच्या तर्फे प्रत्येकी शाल,श्रीफळ, भेटवस्तू,साडी चोळी सह एक मेमँटो देण्यात आला.आणि पुढील आयुष्य निरोगी निरामय राहो हीच सदिच्छा व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव सौ स्नेह प्रभादेवी गहिलोत,प्रमुख अतिथी म्हणून विजयसिंह गहिलोत,तुळसाबाई कावल विद्यालयाचे प्राचार्य श्री अंशुमान सिंह गहिलोत,बाबुळगाव शाखेचे नवनियुक्त प्राचार्य श्री.रमेश पवार सर,उपप्राचार्य एस बी चव्हाण सर,उप मुख्याध्यापिका आर एस ढेंगे,पर्यवेक्षिका पी एम कारस्कर,पर्यवेक्षक एस आर मुखाडे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे बहारदार व मुद्देसूद असे सुंदर संचालन प्रा.पंकज वाकोडे,आभार प्रदर्शन श्री संजय खाडे यांनी केले.