पातुर (प्रतिनिधी)- नुकतेच वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर चे प्राचार्य श्री संजय सौंदळे सर हे आपल्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.श्री संजय सौंदळे सरांनी वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुर येथे सात वर्ष प्राचार्य पदाचा पदभार अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळणाला त्याबद्दल सरांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून विद्यालयात सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी इंदिरा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पातूरच्या प्राचार्या सौ.मीरा ढोकणे मॅडम होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.अनिल सोनटक्के सर तसेच कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून प्राचार्य श्री.संजय सौंदळे सर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शांत,संयमी,सोज्वळ,सुसंस्कृत,कार्यकुशल व्यक्तिमत्त्व असलेले आदरणीय प्राचार्य श्री.संजय सौंदळे सरांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ तसेच विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वतीची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य सौंदळे सरांच्या कार्याचा गौरव करणारी मनोगतं व्यक्त केली व भावपूर्ण वातावरणात सरांना निरोप दिला.

आदरणीय श्री.रामसिंगजी जाधव साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ दिला नाही व साहेबांनी माझ्यावर केलेले उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही असे विचार प्राचार्य संजय सौंदळे सरांनी आपल्या मनोगत पर भाषणातून व्यक्त केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन तसेच आपल्या कार्याचा गौरव केल्याबद्दल वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.टी गाडगे यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रदर्शन प्रा.एस बी आठवले यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.