पातुर प्रतिनिधी:-पातूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मृतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

गुजरात राज्यतील अहमदाबाद येथे दिनांक १२ जुन रोजी एअर इंडिया प्रवासी विमानाचे दुर्दैवी अपघात होऊन सैकड़ों नागरिकांचे प्राण गेले भारत देशाला हादरुन टाकणारी ही दुःखद घटना घडली आहे.या बातमी ने सर्व भारत हादरला आहे.या घटनेमुळे कांग्रेस पक्षाने आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून अखिल भारतीय कांग्रेस कमिटी ने तिन दिवसीय दुखवटा जाहीर केला आहे.

या निम्मताने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष अशोक अमानकर यांच्या सुचनेवरुन श्रध्दांजली अर्पण हा कार्यक्रम पातुर शहर कांग्रेस व तालुका कांग्रेस कमेटी चे वतीने शहर कांग्रेस कमेटीचे जनसंपर्क कार्यालय वर घेणयात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कांग्रेस नेता हाजी सै कमरोद्दीन होते.या वेली विमानातील नागरिक,मेडिकल कॉलेज चे विद्यार्थी,कर्मचारी अपघातात मूत्युमुखी पडलेल्यानां श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाला तालुका कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेश गावंडे शहर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद,माजी सरपंच मोहम्मद शब्बीर,जिल्हा सचिव अतुल अमानकर,बब्बू भाई,माजी अध्यक्ष भिमराव कोथलकर,कु कृषी उत्पन्न बाजार समितीचे दौलतराव घुगे,शेख मुख्तार नजीब, मोहसिन खान,राजेश अत्तरकार,सै कौसर,मधू ईंगले,नामदेव करोड़वें,गजानन चव्हाण,सुभाष भांगे,नवेद खान,सचीन अंभोरे,सह काँग्रेस चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.