पातुर प्रतिनिधी :-तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे 79 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला “कठोर परिश्रम म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी किंवा ध्येयासाठी सतत आणि उत्साहाने प्रयत्न करणे.यात मेहनत,चिकाटी,समर्पण आणि आणि जीवनात योग्य निर्णय आवश्यक आहे”.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सचिव सौ स्नेह प्रभादेवी गहिलोत, बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर यांनी केले.
तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे 79 व्या वर्धापन दिन व प्रजासत्ताक सोहळ्यांमध्ये तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथून 2021 मध्ये एसएससी परीक्षा उत्तीर्ण नंतर कु.आचल दिगंबर बंड,पातुर, श्वेता अरविंद इंगळे, शसमीक्षा नितीन इंगळे वाघझडी येथील मुली तुळसाबाई कावल विद्यालयातून टेक्निकल विषय घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.टेक्निकल मुळे आयटीआय मध्ये चांगला ट्रेड मिळाला व त्यानंतर अप्रेंटिस करून आज विद्युत सहाय्यक पदी त्यांची नेमणूक झाली.तसेच भंडाराज येथील जयनंदिनी सुरवाडे ही तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथे 2018 ला एसएससी परीक्षा पास झाली. शिक्षण घेत असताना तिने एनसीसी हा विषय घेतला होता.एनसीसी मुळे ती आज पोलीस कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झालेली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे मेमेंटो,शाल,श्रीफळ व विद्यालयाची स्मरणिका देऊन आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला. आचल दिगंबर बंड चे वडील मजुरी म्हणून काम करतात आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आचलला शिक्षण दिले,याचीच जाणीव ठेवून आचलने अतिशय कष्टाने ही नोकरी मिळवलेली आहे. श्वेता अरविंद इंगळे व समीक्षा नितीन इंगळे ह्या वाघझडी येथील एकाच घरातील मुली आहेत. वडील पारंपरिक शेती करतात व मेहनतीच्या जोरावरती मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून पातुर येथे पाठवतात . याची जाणीव ठेवत विद्यार्थ्यांनी सुद्धा वडिलांच्या मेहनतीला हाक देत स्वतःहा मेहनत घेऊन यश मिळवलेले आहे.
एनसीसी मधील कवायत वर्ग पाचवीपासूनच बघत असताना आपणही अशाच प्रकारचं कोणीतरी एक ऑफिसर व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून दैनंदिनी सुरवाडे हिने एनसीसी घेतले व आज पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तिची नियुक्ती झालेली आहे जयनंदिनीचे आईवडील हे शेतमजुरीचे काम करतात.मुलीला अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण दिले आणि आई-वडिलांच्या परिस्थितीची जाण ठेवत एनसीसी मध्ये सी सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करून त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल पदी स्वतःची नेमणूक करून घेतली या सर्व गोष्टी मागे स्वतःची मेहनत अतिशय महत्त्वाची आहे.आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय सुद्धा महत्त्वाचा आहे.या सर्व चारही विद्यार्थिनींचे संपूर्ण परिसरात कौतुक करण्यात येत आहे.या कौतुक सोहळ्याला बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर चे व्यवस्थापक विजयसिंह गहीलोत, सचिव सौ स्नेह प्रभादेवी गहीलोत, प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत,उप प्राचार्य एस बी चव्हाण,उप मुख्याध्यापिका आर एस ढेंगे,पर्यवेक्षिका पी एम कारस्कर, पर्यवेक्षक एस आर मुखाडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पातुर नगरी येथील प्रतिष्ठित नागरिक विद्यालयातील पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एम राणे व आभार प्रदर्शन सुभाष इंगळे एनसीसी ऑफिसर यांनी केले.
