- एक स्तुत्य सामाजिक उपक्रम
- तब्बल 205 जात प्रमाणपत्र व 322 अधिवास प्रमाणपत्राचे वितरण
पातूर प्रतिनिधी : शैक्षणिक सत्र 2025 26 मध्ये विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांचे तब्बल 205 जात प्रमाणपत्र व ३२२ अधिवास प्रमाणपत्र काढून वितरित करण्यात आले हा एक सामाजिक स्तुत्य उपक्रम सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे घेण्यात आला.

एवढ्या मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र काढून विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या होणाऱ्या आर्थिक व शारीरिक त्रासापासून शाळेने पालकांना वाचवले मला जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला असे प्रतिपादन कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा प्राप्त ऍड.निलेश हेलोंढे पाटील यांनी केले.दरवर्षी विद्यालय मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आवश्यक असणाऱ्या जात प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन शाळेत केल्या गेले होते या प्रमाणपत्राचा वितरण समारंभ कार्यक्रम शाळेत आयोजित केला होता.

या वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड.निलेश हेलोंढे पाटील हे होते तसेच पातुर तहसीलचे तहसीलदार डॉ. राहुल वानखडे गटविकास अधिकारी सौ इंगळे मॅडम संस्थाध्यक्ष सपनाताई म्हैसने, सचिव सचिन समाधान ढोणे,पशुधन विस्तार अधिकारी डॉ. यु. एम. शेगोकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना संवर्गनिहाय जात प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमाच्या उपस्थिती बद्दल संस्थेकडून उपस्थितांचे शाल श्रीफळ देऊन कौतुक व स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण शेगोकार यांनी केले तर आभार सचिन अरबाड यांनी मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.