पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्साहात पार पडली.
गोविंदा गोविंदाचा गजर करत श्रीकृष्ण जन्माष्टमी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरी केली.यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण ची वेशभूषा तर विद्यार्थिनींनी राधाच्या वेशभूषेत येऊन हा उत्सव साजरा केला.

याप्रसंगी दहीहंडीचे पूजन शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे यांनी केले. तर हा उपक्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांच्या मार्गदर्शनात पार पडला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे,नरेंद्र बोरकर,नितु ढोणे,संकल्प व्यवहारे,हरिष सौंदळे, बजरंग भुजबटराव,अविनाश पाटील,अक्षय तायडे,प्रतीक्षा भारसाकळे,प्रियंका चव्हाण,पूजा खंडारे,रेश्मा शेंडे,इकरा आदिबा खान,साक्षी वानखडे,शुभांगी बोरकर,दिव्या गव्हाळे, नयना पटोणे,प्रिया चक्रे,गौरी अमानकर,रुपाली पोहरे,कल्पना वानेरे,शुभम पोहरे,मधुकर बोदडे आदींनी परिश्रम घेतले.