- सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा एक प्रेरणादायी उपक्रम
अकोला : अकोला येथील रणपिसे नगर मधील जागृती विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता अबाधित करण्याच्या दृष्टीने दृष्टीने तोष्णीवाल लेआउट येतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री पुंजाजी शेगोकार यांनी विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली उपलब्ध करून दिली. पेशाने शिक्षक असणाऱ्या व आपले संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खर्ची घालणाऱ्या पुंजाजी शेगोकार यांनी सेवानिवृत्तीनंतरही आपल्या सेवाभावी वृत्तीचा यावेळी प्रत्येय दिला. विद्यालयात विविध शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने एक पेड मा के नाम आणि हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत घेतलेल्या या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना व त्यांच्या मातांना एक वृक्षभेट दिला सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून असे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंजाजी शेगोकार यांनी आपल्या पेन्शन मधून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आबाधीत ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी हा उपक्रम राबवला असल्याची सांगितले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव ऍड.विलास वखरे यांनी स्वीकारले होते तर प्रमुख वक्ते म्हणून ऍड.प्रल्हाद गड्डमवार हे उपस्थित होते. तसेच उमरी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आदित्य शेगोकार यांनी केले तर संचालन सौ वनिता देशमुख यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. नाईक मॅडम सौ मुरूमकर मॅडम, श्री शर्मा सर, सौ बोदडे मॅडम, मेहसरे मॅडम, वानखडेभाऊ यांनी परिश्रम घेतले.