अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकोला जिल्हा अभ्यास वर्ग दिनांक ०२ व ०३ ऑगस्ट २०२५ (शनिवार व रविवार) रोजी श्री सीदाजी महाराज संस्थान,पातूर येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.या दोन दिवसीय अभ्यास वर्गामध्ये कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्य,नेतृत्वगुण,राष्ट्रीय विचारधारा आणि विद्यार्थी समस्यांवर उपाययोजना या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले.अभ्यास वर्गाने अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा व चैतन्य निर्माण केले.या वर्गाला पूर्ण जिल्ह्यातून १०५ हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.याप्रसंगी अग्रिविजन राष्ट्रीय संयोजक मनीष फाटे,विदर्भ प्रांत सह संघटन मंत्री मनोज जी साबळे,विदर्भ प्रांत उपाध्यक्ष प्रा.उमेश कुडमेथे,अकोला जिल्हा प्रमुख डॉ.हर्षवर्धन देशमुख,अकोला विभाग संयोजक सुहास मोरे,अकोला विभाग छात्रा प्रमुख गौरी केंदळे,अकोला जिल्हा विद्यार्थी विस्तारक नुपूर देशपांडे,अकोला जिल्हा संयोजक आदित्य बोर्डे व तसेच व्यवस्था प्रमुख प्रा.विठ्ठल लोथे,अर्जुनसिंह गहिलोत,आयुष उमाळे व सर्व नगरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
