पातुर येथील आमदार डॉक्टर राहुल पाटील शैक्षणिक संकुलातील डॉक्टर वंदनाताई जगन्नाथराव दोन्ही आयुर्वेद महाविद्यालयात शारीर रचना विभागाच्या वतीने अवयव दान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध कार्यक्रमाची रेलचेल होती दिनांक 3 ऑगस्ट 25 ते 15 ऑगस्ट 25 दरम्यान अवयव दान सप्ताह महाविद्यालयात साजरा करण्यात आला दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी अवयव दान प्रदर्शनी चे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर साजिद शेख सर यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर जयश्री काटोले शारीरिकरचना विभागाचे प्रमुख डॉक्टर अभय भुसकडे डॉक्टर रूपाली शेळके डॉक्टर नवीन शेख प्रामुख्याने उपस्थित होते.या सप्ताहामध्ये विभाग प्रमुख अभय भुस्कडे यांनी अवयवानाचे महत्त्व विशद करून त्यातील वैज्ञानिक तथ्य जागतिक स्तरावर अवयव दानाची गरज याविषयी मार्गदर्शन केले.डॉक्टर रूपाली शेळके डॉक्टर नवीन शेख व डाँक्टर रुपाली मालधुरे यांनी अवयव दाना संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया अवयदानाचा अभ्यास प्रात्यक्षिकाकडे करून दाखविला

या सप्ताहामध्ये पोस्ट स्पर्धा रांगोळी स्पर्धा वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम ठेवण्यात आले होते अवयव दान जीवनाची संजीवनी या घोषवाक्य द्वारे संपन्न झालेल्या अवयव दान सप्ताह शहरातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामध्ये प्रामुख्याने पॅराडाईज कॉन्व्हेंट वसंतराव नाईक विद्यालय सावित्रीबाई फुले विद्यालय शिवकृपा कोचिंग क्लासेस पातुर यांच्यासह विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी अवयवादानाचे महत्त्व समजून घेतले साठी अधीक्षक संतोष सोमानी निलेश चिंचोळकर शरद अवचार धनंजय जी मिश्रा सुधीर चव्हाण वैभव सरब रमेश पोरे फारुख शेख फरानमी शंकर इंगळे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय मिश्रा यांनी केले