किड्स पॅरडाईज मध्ये कार्यशाळा
पातूर येथील किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांना शाळू मातीपासून पर्यावरणपुरक गणपती बाप्पा सकरण्याचे धडे गिरवले.आपल्या इवल्या हातानी पर्यावरपुरक सुंदर गणेमुर्ती बनवण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.गणेश मूर्ती मातीची,पर्यावरणाच्या हिताची हे ब्रीदवाक्य घेऊन गेल्या अनेक वर्षापासून पातुर येथे किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूल पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची संकल्पना अमलात आणत आहे.दरवर्षी हा उपक्रम पातूर शहरात राबविण्यात येत आहे. यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळू मातीपासून गणेश मुर्ती बनवण्याची कार्यशाळा नुकतीच पार पडली.शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा पार पडली.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना गणेश मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण शिक्षिका रेश्मा शेंडे यांनी दिले.यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेश मुर्ती बनवून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे,नरेंद्र बोरकर,नितु ढोणे,संकल्प व्यवहारे,हरिष सौंदळे, बजरंग भुजबटराव,अविनाश पाटील,अक्षय तायडे, प्रतीक्षा भारसाकळे, प्रियंका चव्हाण,पूजा खंडारे,रेश्मा शेंडे, इकरा आदिबा खान, साक्षी वानखडे,शुभांगी बोरकर,दिव्या गव्हाळे, नयना पटोणे,प्रिया चक्रे,गौरी अमानकर, रुपाली पोहरे,कल्पना वानेरे,शुभम पोहरे,मधुकर बोदडे आदींनी परिश्रम घेतले.