साहित्यरत्न लोकशाहीर डॉ, अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न

पातुर प्रतिनिधी : जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष लहूश्री विष्णूभाऊ कसबे,तसेच लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष लहूश्री कैलास दादा खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम विदर्भ महासचिव विष्णूभाऊ शेलारकर यांच्या नेतृत्वात पातुर येथे अतिशय उत्साहात भव्य दिव्य मिरवणूक पार पडली.

मिरवणुकीच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान पातुर येथून निघाली होती.राजूभाऊ उगले माजी न.प.उपाध्यक्ष पातुर,गणेशभाऊ गाडगे पातुर मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,विष्णू शेलारकर पश्चिम विदर्भ महासचिव लहुजी शक्ती सेना,प्रभाकर लांडगे संस्थापक अध्यक्ष अण्णाभाऊ साठे कांतभूमी,वासुदेव डोलारे कार्यकारणी सदस्य लहुजी शक्ती सेना,प्रमोद घोडे अण्णाभाऊ साठे कांतभूमी सचिव,यांच्या हस्ते साहित्यरत्न लो.डॉ.अण्णाभाऊ साठे रथाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.ही रॅली पातुर शहराच्या विविध प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.याप्रसंगी बाळापुर चे माजी आ.बळीरामभाऊ सिरस्कार,वेंकटेश बिछायत केंद्राचे संचालक प्रवीण भाऊ इंगळे,नगरपरिषद पातुर चे माजी नगराध्यक्ष हिदायत खान उर्फ इदु पैलवान शिवसेना उ.बा.ठा.गटाचे अकोला जिल्हा युवा प्रमुख सागर रामेकर, यांनी रॅलीचे स्वागत केले.या रॅलीत अकोला जिल्ह्यातून गजानन दांडगे,शाहीर मधुकर नावकर,गजानन दादा साठे, सुनील आवचार, गौरव लोखंडे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा सचिव सदानंद बांगर,व त्यांचे सहकारी,लहुजी शक्ती सेनेचे बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष राहुल घनघाव व त्यांचे सहकारी, बाळापुर तालुक्याचे युवक अध्यक्ष ऋतिक बोरकर व त्यांचे सहकारी,लहुजी शक्ती सेनेचे युवक तालुका उपाध्यक्ष अजय नाटकर व त्यांचे सहकारी,दत्ताभाऊ अवचार व त्यांचे सहकारी, दिलीप अवचार,पत्रकार राजेश अवचार,वेदांतिका संस्थेचे नानाभाऊ सदाशिव,इत्यादी मान्यवरांनी रॅलीचे स्वागत केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे पातुर तालुका अध्यक्ष अजय अवचार,लहुजी शक्ती सेनेचे पातुर शहराध्यक्ष देवाभाऊ वानखडे,अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण मानकर,सचिव अमोल गवई, विलास गवई,रामेश्वर नावकार,हर्षल शेलारकर,दीपक शिंदे, कैलास अंभोरे, शसचिन गवई,निखिल शिंदे,पवन नावकर, श्रीकृष्ण खरात,सचिन शेलारकर,गजानन गवई,दिलीप मानकर,इत्यादींनी सहकार्य केले,कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वितरित करून करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन भाऊ सुरवाडे,प्रल्हाद भाऊ वानखडे यांच्यासह समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले