बाळापुर मतदारसंघाचे महा आघाडीचे शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या प्रचार दरम्यान पातुर शहरांमध्ये शुक्रवारी जनसंपर्क अभियान राबवून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नानासाहेब नगर, रेणुका माता टेकडी नगर, हीरळकार नगर परिसरात अनेक मतदारांनी यावेळी यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत विकासाकरिता आपण अत्यावश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यासोबत नानासाहेब नगर येथील मतदार महिलांनी व पुरुषांनी स्वतः या प्रचारामध्ये सहभागी होऊन उमेदवार नितीन देशमुख यांच्या या परिसरामध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला व आमदार नितीन देशमुख यांनी केलेला पातुर शहरातील विकासाचे जाहीरनाम्याचे पुस्तिका यावेळी मतदारांना वाटण्यात आले शिवसेनेचे शहर प्रमुख निरंजन बंड व युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वात नानासाहेब नगर येथे मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार आमदार नितीन देशमुख यांच्या प्रचारामध्ये शहरात मोठ्या प्रमाणात प्रचाराची आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे प्रचारादरम्यान पातुर शहरात सर्वत्र नितीन देशमुख यांचा बोल बाला दिसत आहेत
