प्रतिनिधी संगीता इंगळे
विविध सणांनी संस्काराने परंपरांनी राष्ट्रीय उत्साहाने नटलेला आपला भारत देश त्यात महाराष्ट्र राज्यामध्ये श्रावण महिन्यात येणाऱ्या नववधूचा मंगळागौरपूजन या धार्मिक संस्कार जपणाऱ्या सणाचा सोहळा खूप नाविन्यपूर्ण आहे त्यामध्ये नववधू वर आपल्या संस्कृतीतील सणांचे संस्कार व्हावे म्हणून धार्मिक संस्काराबरोबरच महिलांचे संघटन सामाजिक परंपरा कौशल्य गुण व खेळीमेळीचे वातावरणाने एकत्रित जमून हा सण साजरा करण्यात येतो गेल्या तीन वर्षापासून श्रावण सरी मंगळागौर शेगाव हा ग्रुप आमंत्रित घरोघरी जाऊन ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये अगदी ० ते ५ वर्ष वयोगटापासून ते ६० वर्ष वयोगटापर्यंत जवळजवळ २० मुली व महिला सामील आहेत यामुळे लहान मुलींना सुद्धा या सणांची संपूर्ण माहिती होण्यास मदत होते व बालवयातच तिच्यावरच हिंदू धर्माचे संस्कार होतात सामाजिक परंपरा बांधिलकी मनातील प्रसन्नता सहज खेळण्यातून शारीरिक कौशल्य जपण्यासाठीच व सर्व समायोजक जीवन जगण्याची शैली अंगीकरिता आली पाहिजे याकरता हा उपक्रम श्रावण सरी मंगळागौर ग्रुप शेगाव यांनी हातात घेतला आहे
सौ अंजली मोहन देशपांडे यांच्या संकल्पनेतून मंगळागौर खेळ शेगाव शहरांमध्ये सुरू झाला यात सर्व महिला खूप आनंदाने उत्साहाने सहभागी होत आहे.काही खेळ हे अनेक जुन्या गोष्टीची आठवण करून देणारे आहेत जसे की घागर सुप जाते तर काही खेळामध्ये काही संदेशही देता येतात व गोफ,हा खेळ असा आहे की अनेक विचारांमध्ये मनुष्य गुंफून जातो आणि त्यातूनच सहजरित्या बाहेर कसे पडावे हेही यातून संदेश मिळतो थट्टा मस्करी सासु सुनेचा भांडण शरीराची लवचिकतेसाठी असलेले खेळ असे विविध खेळानी हा पारंपारिक सण साजरा केला जातो.आता सध्याच समाजाची बांधिलकी एकजूटता आपुलकी जिव्हाळा प्रेम सहाय्यता या अनेक विचारांची सांगड एकत्र व्हावी म्हणून कुटुंबातील महिलांकडेच प्रमुख दायित्व आहे असं म्हटलं जाते म्हणूनच सौ अंजलीताई जोशी यांनी अशाच धार्मिक सण उत्सवात समाजाची समानथा दडलेली आहे व त्यातूनच समाजाचा पाया पक्का होऊ शकतो यासाठी सर्वांनी असे उपक्रम आपली नैतिक जबाबदारी म्हणून राबवावे असे मनोमन वाटते.