दि.१५/०७/२०२४ रोजी गोकुल राज जी, सहाय्यक पोलीस अधिक्षक, नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापुर यांनी पातुर ते वाशिम रोडवरील बोडखा परीसरातील असलेल्या नॅशनल ढाबा येथे काही लोक अवैधरित्या पेट्रोल व डिझेल चा साठा करून ते विक्री करीता बाळगुन आहेत. वरून IPS गोकुल राज जी, सहायक पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. किशोर शेळके सोबत पो स्टॉफ सह जावुन रेड कारवाही केली असता. एक महिंद्रा बोलेरो पिकअप कंमाक MH29 AT0048 किंमत अंदाजे ३०००००/रु., सहा प्लॅस्टीकचे बॅरल २५० लीटर क्षमतेची ज्यामध्ये डिझेल पुर्ण भरलेले असे एकुण १५०० लीटर व एक प्लॅस्टीक बेरेल अंदाजे २० लीटर डिझेल असे एकुण १५२० लीटर किंमत १५२०००-/रू. चे डिझेल, तीन प्लॅस्टीकचे बॅरल २५० लीटर क्षमतेची पेट्रोलने पुर्ण भरलेले असे एकुण ७५० लीटर किंमत ७८७५०-/रू. चे पेट्रोल, द्राव्यरूपी ज्वलनशील इंधन मोजण्यासाठी एक दहा लिटरचे माप किंमत अंदाजे २००-/ रूपये, एक विस लिटरचे माप किंमत अंदाजे ३००-/ रू., एक प्लॅस्टीकची चाडी व जुन्या वापरत्या प्लॅस्टीकचे कॅन व एक प्लास्टीक पाईक किंमत अंदाजे २००-/ रू. असा एकुण ५३१४५०-/ रू.चा मुदद्देमाल मिळून आल्याने आरोपी नामे १) नवाज खान परवेज खान वय २३ वर्षे, रा. चांद खॉ प्लॉट वाशिम बायपास अकोला., २) मोहम्मद फरहान मोहम्मद रज्जाक वय ३६ वर्षे, रा. रियाज कॉलनी वाशिम बायपास अकोला. यांचे हे विरूध्द पो.स्टे. पातुर येथे अप.नं.३९५/२०२४ कलम २८७, ३(५) भा. न्या. सं. सहकलम ३, ७ ई सी अँक्ट. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक, बच्चन सिंह IPS अकोला यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास पातुर ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत
