के.के.आर संघ ठरला विजेता
रॉयल अल्फला संघ उपविजेता
पातूर : बाळापुर विधानसभा युवकांसाठी श्री कृष्णाभाऊ अंधारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्त बाळापूर विधानसभा गौरव चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन लोकशक्ती युवा मंच पातुर द्वारा करण्यात आले होते. या मध्ये बाळापुर विधानसभा ग्रामीण भागाच्या युवा खेळाडूंनी मोठ्या संख्येत आपला सहभाग नोंदविला. सातत्याने हे आयोजन दहा दिवसापासून पातूर येथे सुरू होता.या स्पर्धेमध्ये अंतिम सामना के.के.आर संघ पातुर विरुद्ध रॉयल अल्फलाह संघ पातूर यांच्या दरम्यान खेळण्यात आला ज्या मध्ये के.के.आर संघ पातूर हे विजय झाला.

या स्पर्धेचे भव्य बक्षीस वितरण सोहळा दिनांक. 22/05/2024 रोजी मा.श्री कृष्णाभाऊ अंधारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा,मा.न.प अध्यक्ष हाजी सैयद बुरहान ठेकेदार,यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहबाबू विद्यालय क्रीडा मैदान येथे संपन्न झाला. यावेळी हाजी सैयद कामरोद्दिन,मा.न.प उपाध्यक्ष सैयद मुजाहिद इक्बाल ,मा.न.प सदस्य मो.एजाज मो.तालेब, मो.नजीब सेठ,नईम खान, रामा अमानकर, डॉ.सैयद वासिमोद्दीन,ताबिश हुसैन,रफीक सौदागर सर,कमरुज्जमा खान उर्फ बाबू डॉन,शब्बीर सेठ,बबलू बायस, संजय शिरसाट, ऍड.वाकोडे, सैयद वाजीद अली,डी.आर.सी चव्हाण सर, गोपाल ठाकरे,समीर बुरहानी,फैसल सर रिसोड,उपस्थित होते. कार्यक्रमा साठी पत्रकार नातिक शेख, सैय्यद नवेद,सलमान वकार खान,गोलू पाटील,यांनी परिश्रम घेतले.