पातुर प्रतिनिधी पातुर वाशिम नवीन बायपास महामार्गावर 23 जुलै रोजी सकाळी शेतात जाणाऱ्या दुचाकी स्वरास धडक दिल्याने एक ठार झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. सविस्तर हकीकत अशी आहे की पातुर वाशिम नवीन महामार्ग वरून पातुर येथील शेतकरी शेख रजीक बादशहा व त्याचा मुलगा शेक आरान हे दोघं बापलेक सकाळी आठ वाजताच्या दरम्यान मोटरसायकल mh 30 bb 8294 ने शेतात फवारणी करता जात असताना वाशिम कडून येणाऱ्या चार चाकी mh 30 8294 वाहनेने या दोघांना धडक दिल्याने या अपघातात शेतकरी मजूर शेख राजिक राहणार जमादार प्लॉट वय 42 हे घटनास्थळीस ठार झाले तर त्यांचा मुलगा शेख अरान शेख रजिक हा गंभीर जखमी झाला . घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन जखमी यास अकोला येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले घटनास्थळी पातुर पोलीस पोहचून घटनेचा पंचनामा केला पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत
