बाळापुर मतदारसंघात अपक्ष उमेदवार श्री कृष्णा अंधारे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा मिळाल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. प्रचारादरम्यान त्यांना बाळापूर मतदारसंघात नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या अगोदर त्यांना संभाजी ब्रिगेड या पक्षाच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले आहे.
*बाळापुर पातुर तालुक्यातील सर्व युगांनी श्रीकृष्ण अंधारे यांच्या पाठीशी उभे राहावे- शंतनु वसु युवक जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ* आज श्रीकृष्ण अंधारे अपक्ष उमेदवार बाळापूर विधानसभा मतदारसंघ यांना अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे पाठिंबा देण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्व बांधवांनी श्रीकृष्ण भाऊ अंधारे यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना विजय करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली…यावेळी जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष शंतनू वसु, महिला जिल्हाध्यक्ष सौ कल्पनाताई बिडवे, विभागीय अध्यक्ष श्री योगेश भाऊ थोरात, वैद्यकीय जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत काळे, गजानन पाटील नरेश सूर्यवंशी रश्मीताई पाटेकर दीपक गावंडे काशिनाथ पाटेकर यांच्यासह मराठा महासंघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
