पातुर नगर परिषद चे व्यापारी संकुल असून या संकुलाचे गाळे भाडे गेल्या चार वर्षापासून थकीत होते . शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड प्रमाणात भाडे वाढ करण्यात आली होती याबाबत काही व्यापारी हे न्यायालयात गेले होते. याबाबत बाळापुर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी या विषयात शासकीय स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यापाऱ्यांना न्याय देण्याचे काम केले.

गेल्या चार वर्षांपासून थकीत असलेले भाडे हे दहा टक्के वाढून संकुल भाडे भरण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता . याबाबत नगरपरिषद ने वेळोवेळी व्यापाऱ्यांना थकबाकी भरण्याचे नेहमी आवाहन केले परंतु काही थकबाकीदार जाणून बुजून हे गाळे भाडे भरत नसल्याने थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढत होती याकरिता पातुर नगरपरिषद मुख्याधिकारी सय्यद ऐसानुद्दीन व त्यांचे कर्मचारी यांनी प्रत्येक दुकानात जाऊन थकबाकी धारकांना थकबाकी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत गाळे धारकांनी थकबाकी जमा करण्याची सहमती दर्शवली.