दिनांक 30 जुलै रोजी रात्री पातूर परिसरात प्रचंड प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याने शिरला ,भंडाराज , जिराईत पातुर, बगाईत पातुर , पट्टे अमराई या परिसरामध्ये सोयाबीन, तूर, फुल शेती, फळबाग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतजमिन ही खरडून गेली आहे या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी करिता बाळापुर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख निरंजन बंड यांच्या नेतृत्वात आज पातुर तहसीलदार यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता निवेदन देण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी व शिवसेनेचे शहर प्रमुख
निरंजन बंड, परसराम उंबरकार, प्रदीप काळपांडे, कैलास बगाळे, आनंद तायडे, सचिन गिरे, कृष्णा बोंबटकार ,संदीप इंगळे, ज्ञानेश्वर पातुरे, योगेश पातुरे, गुलाब निमकंडे, रामेश्वर बेलूरकर, प्रदीप इंगळे, गणेश नीलखन ,अमोल फुलारी, गजानन नामदेव वानखडे, सुरेश रामभाऊ फुलारी, वसंता बगाळे, निलेश फुलारी, नारायण खर्डे, रवी काकड ,अतिश इंगळे, गणेश इंगळे , विष्णू ढगे,यांच्यासह शेकडो नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते

Oplus_131072