प्रतिनिधी पातुर (शिर्ला अंधारे)
डॉ.पंजाबराव देशमुख कृषिविदयापीठ,संलग्नित श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषिमहाविदयालय येथील अंतिम वर्षाच्या विदयार्थिनींनी (ग्रामिण कृशीकार्यानुभव) भंडारज गावात दाखल झाले या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना मृदा विज्ञान विषय म्हणजेच मातीची निर्मिती वर्गीकरण आणि मॅपिंगसह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक संसाधन म्हणून मातीचा अभ्यास; मातीचे भौतिक , रासायनिक,जैविक आणि सुपीकता गुणधर्म;आणि हे गुणधर्म मातीचा वापर या विषयी जण जागृती करणे असा होतात्या सोबतच शाश्वत शेती विषयक व्यवहारिक ज्ञान पोहचविने हा होता. शेतकयांनी -विद्यार्थिनिनचे उत्साहपुर्ण स्वागत केले आणि कार्यक्रमास सहभाग घेतला.शेतकऱ्यांना पिक उत्पादन माती परिक्षण शेत व्यवस्थापन नियोजन आणि पिकांची आरोग्य सुधारणा वा विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती आणि प्रात्याक्षिक मार्गदर्शन करतील.
याशिवाय सामाजिक आर्थिक आणि तंत्रज्ञानिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना उपयुक्त उपक्रम राबवतील या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. श्री. राम खरडे सर, . शिक्षण विभागाचे प्रमुख रोहित कनोजे सर, ग्रामिण कृषिकार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख(RAWE) पांडुरंग जाधव ,मृदा विज्ञान विभागाचे प्राध्यापक पोरे मॉडम व कार्यक्रमाचे समन्वयक, श्री शिवकुमार राठोड सर तसेच नारायण अमानकर, महेंद्र शेंडे गोपाळ खेकडे, हे शेतकरी उपस्थित होते: कृषिकन्या : रुचिता ढाकरे, ज्ञानेश्वरी अमानकर, चंचल पंडित