पातूर दि -20/02/24
धनेश्वरी मानव विकास मंडळ द्वारा संचालित डॉ वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यानिमित्त विविध वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन विषयक कार्याची माहिती दिली. महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदर व कल्पकतेने लेझीम च्या गजरात शिवजन्मोत्सवाचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी अफजलखानाच्या वधाचे नाट्य दृश्य मोठ्या ताकदीने सादर केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संजय खडतकर,डॉ.साजिद शेख, प्राचार्य जयश्री काटोल, उप प्राचार्य डॉ.अभय भुस्कडे,डॉ. शैलेश पुंड,डॉ.कुटासकर,डॉ.तुषार काकर,अधीक्षक श्री पणसकर, धनंजय मिश्रा, डॉ नितीन शेंडे, प्रा.प्रशांत निकम कार्यक्रमाला उपस्थित होते.

तसेच डॉ.अतकर,डॉ.नविन देवकर,डॉ.वसीम, मनोहर उगले, दिलीप बगाडे,बाळू राऊत, संदीप गिऱ्हे रमेश पोहरे, वसंत पोहरे व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचीहि उपस्थिती या कार्यक्रमाला होती.
कार्यकमाचे सूत्रसंचालन व सुनियोजित कार्यक्रम नियोजन प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.