अकोला : डॉ पंजाबराव
देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला(अंधारे), येथिल विद्यार्थ्यांनी पातुर तहसील चे नांदखेळ गावात जाऊन शेतकऱ्यांना शुन्य उर्जा थंड कक्ष ज्याला इंग्रजीत(ZERO ENERGY COOL CHAMBER) असे म्हणतात. याचे लाभ आणि कक्ष बनवन्या ची प्रक्रिया समजून सांगितली. यामध्ये कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी शरयू अडोळकर, नेहा आंबुसकर, साक्षी बुरान, नारायणी चौधरी, प्रेरणा ढोरे, कल्याणी धोटे सहभागी होते .यावेळी नांदखेळ गावातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिति होती. या उपक्रमासाठी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खर्डे सर, विषय तज्ञ प्रा.एस.ए खवणे मॅम,कार्यक्रम समन्वयक प्रा.शिवकुमार राठोड सर व प्रा.भगत सर यांचे मार्गदर्शन लाभले.
