सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा थाटात
पातूर प्रतिनिधी: सायन्स ऑलम्पियाड फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑलम्पियाड परीक्षेत पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या १९ विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळवून विक्रम केला आहे.सायन्स ऑलम्पियाड फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण जगभरात जी के,विज्ञान,गणित विषयाच्या परीक्षा घेण्यात येतात.यामध्ये सोळा देशातील विद्यार्थी सहभागी होत असतात.नुकताच या परीक्षेचा निकाल घोषित झाला.यामध्ये पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या एकोणवीस विदयार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळवण्याचा बहुमान मिळवला.

या विदयार्थ्यांचा शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे यांनी सन्मान केला.यामध्ये सायन्स,जी के आणि मॅथ ऑलम्पियाड मध्ये घवघवीत यश मिळवून सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी अन्वी तेजनकर,ऋतुजा राठोड ओम जाधव,प्राची धाडसे,अमृता शेंडे,मानसी देशपांडे,स्पंदन गाडगे,मनस्वी गवई,ऋषी खेकडे,अनुश्री ताले,आयरा खान,सीमा साजिद शेख,शरयू राखोंडे,संग्राम इंगळे,स्मिता खरात,बोधी खंडारे,पूर्वी नाकट,अश्विनी टाले,सिद्धांत पेंढारकर आदी विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.संचालन चंद्रमणी धाडसे व नितु ढोणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे,नीतू ढोणे,संकल्प व्यवहारे,नरेंद्र बोरकर,बजरंग भुजबटराव,अविनाश पाटील,हरीष सौंदळे,रविकिरण अवचार,पंकज आवचार,प्रतीक्षा भारसाकळे,शितल गुजर,ऋतुजा अवचार,नेहा उपर्वट,नयना हाडके,स्वाती वालोकार,प्रियंका चव्हाण,पुजा खंडारे,प्रचाली थोराईत,रेश्मा शेंडे,इकरा अदिबा आलियार खान,योगिता शर्मा,अक्षय तायडे,नयना पटोले,रूपाली पोहरे,कल्पना वानेरे,शुभम पोहरे,मधुकर बोदडे यांनी परिश्रम घेतले.