डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय सलग्नित श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे याच्या वतीने ग्राम नांदखेड येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत माती परिक्षण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे दरम्यान. शेतकऱ्यांना माती परिक्षणाची महत्व, माती परीक्षण का करावे त्याचे फायदे,
माती परीक्षण कशी करावे याबद्दल विद्यार्थ्यांनी महत्व पटवून दिले. त्यादरम्यान प्रगतशील शेतकरी
हरीदास माने, दिगांबर जोगतळे, बाबुराव माने, गणेश इंगळे, प्रकाश बोतरकर, विजय वानखडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविघालय शिर्ला अंधारे येथील प्राचार्य डॉ. राम खर्डे, कार्यक्रम अधिकारी प्रा. शिव कुमार राठोड, प्रा श्रद्धा चव्हाण, कार्यक्रम समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयती सातव्या सत्रातील विद्यार्थीनीं शरयू अडोलकर, साक्षी बुरान, नेहा अंबुसकर, प्रेरणा ढोरे, नारायणी चौधरी, कल्याणी धोटे यांनी यशस्वी आयोजित केला.
