पातुर प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य मराठी विषय राज्य कार्यकारिणीची आभासी बैठक अध्यक्ष प्रा.सुनील डिसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीमध्ये सचिव प्रा.बाळासाहेब माने यांनी राज्याच्या मुख्य कार्यकारणीसह मराठी विषयाची ३५ जिल्ह्यांची जिल्हाध्यक्षांची निवड या कार्यकारणीमध्ये जाहीर केली.मराठी विषय राज्य कार्यकारिणीसाठी अकोला जिल्हाध्यक्षपदी पातुर येथील तुळसाबाई कावल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रा. निलेश पाकदुने यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.जिल्ह्यातील उच्च माध्यमिक स्तरावर मराठी विषयाच्या शिक्षकांच्या विविध समस्या सोडविणे,तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी गेल्या 14 वर्षापासून राज्य कार्यकारणी ही प्रयत्नशील आहे.जिल्ह्यात उच्च माध्यमिक स्तरावरील मराठी शिक्षकांचे मजबूत संघटन तयार करण्यासाठी लवकरच जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश पाकदुने यांनी सांगितले.त्यांच्या निवडीबद्दल राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष प्राध्यापक.सुनील डिसले, सचिव प्राध्यापक बाळासाहेब माने,सहसचिव प्रा. डॉ. स्मिता भुसे,कार्याध्यक्ष – डाॅ. मनीषा रिठे (वर्धा )उपाध्यक्ष,डाॅ. प्रतिभा बिस्वास,डाॅ. ज्ञानेश हटवार,बेरार एज्युकेशन सोसायटी पातूरच्या सचिव स्नेहप्रभादेवी गहिलोत,व्यवस्थापक, विजयसिंहजी गहिलोत,प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
