पातूर : बाळापूर विधानसभा
मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांना सर्व जाती, धर्मातील लोकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. आसोला आणि बाभूळगाव येथे झालेल्या प्रचंड जाहीर सभेला मोठ्या संख्येने सर्व जाती, धर्मातील नागरिकांची उपस्थिती होती. या सभेमध्ये कृष्णा अंधारे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पातूर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक बाळासाहेब तायडे पाटील म्हणाले की, बाळापूर विधानसभा मतदार संघात शेतकरी व सर्वसामान्यांसह युवकांचे मोठे प्रश्न आहेत. पातूर व बाळापूर गावाला बाहेरगावावरुन आलेल्या लोकांना थांबण्याकरिता कोणतेही व्यवस्था नाही, बाजार माल विक्रीसाठी आणला असता शेतकऱ्यांना मुक्कामाकरिता शेतकरी भवन नाही. दोन्ही तालुक्यांत औद्योगिक विकास महामंडळामध्ये कोणतेही उद्योग नाही. यामुळे युवकांना रोजगार नाही. बेरोगारीचे प्रमाण वाढत . आहे. या सोबतच विकासाचे अनेक कामे अद्याप बाकी आहेत. सिंचनाकरिता अजून बऱ्याच जागा असताना सिंचनाची क्षमता वाढविण्याकरिता कोणी पुढाकार • घेत नाही. यामुळे यावेळी जागरुक मतदार शेतकरी हा अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांच्या पाठीशी. खंबीरपणे उभा राहणार असून यावेळी पुन्हा एकदा इतिसास या मतदार संघात घडेल, असा विश्वासही – तायडे यांनी व्यक्त केला आहे. विविध पक्षांना कंटाळलेले मतदार
करणार आहेत, ते या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत. यामुळे कृष्णा अंधारे यांना यावेळी मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब तायडे पाटील यांनी केले आहे. कृष्णा अंधारे यांनी आतापर्यंत दीडशे गावांना भेटी देऊन जवळसास ३० हजारांच्यावर मतदारांसोबत संपर्क केला असून त्यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा दिसत आहे, असेही बाळासाहेब तायडे यांनी सांगितले.
यावेळी कृष्णा अंधारे यांना मतदानयुवकांना रोजगार उपलब्ध करून देणार –

कृष्णा अंधारे
बाळापूर विधानसभा मतदार संघात शेतकरी व सर्वसामान्यांच्या मुलाला काम मिळेल, असा कोणताही उद्योग लोकप्रतिनिधींना उभारता आला नाही. यामुळे अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे ते다 अविवाहित आहे ही बाब तरुणाच्या आई- वडिलांना सतावत आहे. यामुळे या भागात उद्योग धंदे उभारण्यावर उটা भर देणार व मतदार संघातील अविवाहित युवकांमात काम मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार जेणेकरून त्याचे पुढील आयुष्य सुखी होईल, अशी ग्वाही कृष्णा अंधारे यांनी दिली.