पातूरः पातूर तालुक्यातील बोडखा येथील भीमसम्राट मित्र मंडळ व विशाखा महिला संघ यांच्यावतीने गुरुवार, ३० जानेवारी २०२५ रोजी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाच्या सांगता समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख धम्मदेसना पूज्य भदंत बी. संघपाल महाथेरो, पूज्य भदंत श्रद्धपालजी, पूज्य भदंत करुणानंद थेरो, पूज्य भदंत धम्माबोधी थेरो, पूज्य भदंत एन. धम्मानंद यांनी दिली. तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पी.जे. वानखडे, नंदकुमार डोंगरे, विजय जाधव, विजय हिवराळे, रमेश गवई, राजेश सरकटे, गोपाल खंडारे, बबीता वानखडे, प्रवीण अंभोरे हे होते.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तर तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पुष्पाने पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन पुष्पमाला अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन विचार मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सुरवाडे यांनी केले. भोजनदान झाल्यानंतर जाहीर धम्मदेसना पूज्य भिक्खूंनी उपस्थितीतांना दिली. त्यानंतर सायंकाळी सात वाजता जनसेवा गायन मंडळ, बोथाकाजी यांच्या बुद्ध – भीम गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने सांगता झाली. या कार्यक्रमाला पांडुरंग इंगळे, सुरेश वानखडे, साहेबराव वानखडे, रमेश शिरसाठ, रवींद्र बोरकर, गणेश शिरसाट, बाळू रामा वानखडे, मोतीराम वानखडे, रवी सह्याद्री वानखडे ,सतीश गवई, करवते इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रा. जयेंद्र बोरकर, प्रवीण वानखडे, नितेश वानखडे, सुमेध सिरसाट, मुकेश सुरवाडे, मिलिंद इंगळे, अश्विन सुरवाडे, रवी सिरसाट, नीलेश वानखडे, डॉ. राज बोरकर, विशाल सिरसाट, सचिन बोरकर, सुरेश वानखडे वस्ताद यांनी घेतले.
