पातूर शहरा मध्ये धुनी भांडी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेच्या घरामध्ये आपसात वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले .यानंतर या प्रकरणात पातूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली परंतु गुरुवारी पातूर पोलिसांनी या मजुरी करणाऱ्या परिवाराला पोलीस स्टेशन मध्ये बोलवून तुम्हाला जेलमध्ये टाकतो कोर्टात चकरा मारायला लावतो अशा धमक्या देऊन प्रकरण आपसात करण्याच्या नावाखाली तीन हजार रुपयाची सेटिंग केल्याची चर्चा पासून शहरात असून सदर महिलेने आपबिती सांगितली असून, याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करणार असल्याचे सुद्धा सांगितले
पातूर शहरांमध्ये अकोला रोडवर राहणाऱ्या एका महिलेचा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते चार दिवसा अगोदर या महिलेच्या घरामध्ये कौटुंबिक वाद झाला यानंतर या महिलेच्या मुलाने पातूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर गुरुवारी पातुर पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक यांनी या परिवाराला पोलीस स्टेशनमध्ये बोलावाले व तुम्हाला जेलमध्ये टाकतो नाहीतर तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावून कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये अशी धमकी देऊन प्रकरण आपसात करावे. करायचे असल्यास तीन हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. उगाच झंझट नको म्हणून या महिलेने हे पैसे दिल्याचे सुद्धा सांगितले आहे पातूर पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोणताही वाचक नसून काही सेटिंग मास्टर दररोज प्रकरणाचा निपटारा करण्याकरता वसुलीचा गोरखधंदा चालू आहे. गेल्या काही दिवसा अगोदर पातूर पोलीस स्टेशनच्या आवारातच एका पोलीस कर्मचाऱ्यावर लाच घेण्याचा प्रकार उघडकीस झाला होता यावरून पातुर पोलिस स्टेशन चा कारभार कसा सुरू आहे याचा प्रत्यय येतो. पातुर तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराचे लोन मोठ्या प्रमाणात पसरले आहे पातूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आलेल्या कोणत्याही तक्रार करण्याची तक्रार ऐकून घेण्याची त्याला धापधाकड करून परत करण्यात येते ग्रामीण भागातील एक महिला तीन दिवसा अगोदर रात्री पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असता तीची तक्रार घेण्याआधी तिला परत करण्यात आले होते आणि आता एका मजुरी करणाऱ्या महिलेकडून तिच्या कुटुंबातील कलहाचे प्रकरण आपसात घेण्याकरिता सेटिंग केल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा पातुर पोलीस स्टेशन चा कारभार चव्हाट्यावर आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा तथा या मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे पातुर पोलीस स्टेशनच्या कारभाराबाबत राज्य शासनाकडे आवाज उठवतील काय अशी अपेक्षा पातुर तालुक्यातील जनता करीत आहे याप्रकरणी सदर महिलेने वरिष्ठाकडे तक्रार दाखल करण्यात असल्याचे सुद्धा आमच्या प्रतिनिधीकडे बोलून दाखवले
