चान्नी ठाणे हद्दीतील विवरा परिसरातील घटना
विवरा : पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत विवरा चरणगाव रस्त्यावरील सोलर प्लांटच्या बाजूला संशयस्पद इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना मंगळवार दि.१० जून रोजीच्या संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली,रमेश निंबोकार ४९ असे मृतक इसमाचे नाव आहे.मृतक दुपारी घरून कामानिमित्त बाहेर गेला होता. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास विवरा परिसरात संशयस्पद मृतदेह आढळल्याचे वृत्त गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली, ठाणेदार रवींद्र लांडे आपल्या ताफ्यासह त्वरित घटनास्थळी दाखल झाले,आणि मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले आहे.मृतक रमेश निंबोकार याचा संशयस्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपासाची प्रक्रिया चान्नी पोलिसांनी सुरू केली आहे.
प्रतिक्रिया
विवरा परिसरात संशयस्पद इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल
रवींद्र लांडे ठाणेदार चान्नी