पातूर प्रतिनिधी:- पातुर तालुक्यातील बुलढाणा अकोला सीमेवर वसलेल्या उमरा गावाच्या परिसरात ढगफुटी झाल्याने झरंडी गावाला पाण्याचा वेढा असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते झरंडी गावाचा काही काळ संपर्क तुटला होता.

पातुर तालुक्यातील निर्गुणा नदीला या ढगफुटी मुळे मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता इशारा देण्यात आला आहे.पातुर तालुक्यात सतत सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांनी सावधान राहावे अशा सूचना प्रशासनाने दिले आहेत.विश्वमित्र नदीला मोठा पूर आल्याने पूर्ण गाव पाण्याखाली आले आहे

विद्युत खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा बंद झाला गावात येण्याची सर्व मार्ग बंद झाले आहे.तसेच आलेगाव,सस्ती नद्यांना सततच्या मुसळधार पाऊस पडल्याने निर्गुणा नदी ला मोठा पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांना सावध,सतर्कतेचा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे.