आमदार नितीन बापू देशमुख यांच्या हस्ते सत्कार
पातुर प्रतिनिधी:-पातुर येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन बापू देशमुख हे होते.या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख सागर रामेकर,तालुका अध्यक्ष रवी मुर्तडकर, हिदायत खान रुमखान माजी नगर अध्यक्ष पातुर,सागर कढोणे,सेवानिवृत्त प्रा.जे डी जाधव मंचावर उपस्थित होते.

इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी मध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार नितीन बाप्पू देशमुख यांच्या हस्ते सत्कार सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे हे यश केवळ गुणांचे नसून, त्यांच्या प्रयत्नांचे आणि शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे तसेच ज्या विद्यार्थींनी चे आई वडील नाहीत अश्या विद्यार्थींनीच्या पाठी मागे शिवसेना उभी राहील.असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे आमदार नितीन देशमुख यांनी केले.यावेळी हिदायत खान रुम खान ऊर्फ ईदु भैय्या,युवा सेना उपसचिव दिपक बोचरे,शिवसेना तालुका प्रमुख रविभाऊ मुर्तडकर,शहर प्रमुख निरंजनभाऊ बंड,युवा सेना उपजिल्हा प्रमुख सागर भाऊ रामेकर, राजू भाऊ भगत,अनिक पटेल,अनिल भाऊ निमकंडे,सुरेंद्र भाऊ उगले,प्रमोद भाऊ देशमुख,महफूज़ भाई,विष्णु खुरसडे,सागर भाऊ कढोने,छोटू भाऊ काळपांडे,पवन भाऊ तायडे, गणेशभाऊ घुगे,महेश कचाले,आनंद भाऊ तायडे,अजय पाटील,विशाल भाऊ तेजवाल,सचिन गिरे,रामेश्वर बेलूरकर, तुषार शेवतकर, ईश्वर भिसे,पालक,शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप काळपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवसेना शहर प्रमुख निरंजन बंड यांनी केले.