पातुर प्रतिनिधी
पातुर येथे ट्राॅफीक पोलीसांच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त भावीक भक्त,वारकरी हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर ला जात असतात.पातुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित ट्राॅफीक पोलीस यांनी मानुसकी व धार्मिकता जोपासली

पातुर ते पंढरपूर ला वारकरी,वारी दर्शनासाठी जाणाऱ्या वाहन चालक यांचा पातुर पोलीस स्टेशन च्या वतीने टोल पास वितरण,व टोपी,दुप्पटे व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पातुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार हनुमंत डोपेवाड साहेब यांच्या सह टाॅफीक पोलीस ज्ञानेश्वर चीकटे,ठाकुर मेजर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.