पातूर :-औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पातूर येथे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असुन विविध ट्रेडच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत २०२४ वर्षासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असुन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी ३ जूनपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ३० जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.यावर्षी पातूर आयटीआय येथे प्रवेशासाठी फिटर, इलेक्ट्रिशियन,वायरमन,मेकॅनिक डीझेल, ड्रेस मेकिंग ट्रेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत . तसेच वेल्डर ट्रेड प्रस्तावित आहे. प्रशिक्षणार्थाना सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज भरून नजिकच्या आयटीआयमध्ये अर्ज स्वीकृती केंद्रात कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चिती करुन घेता येणार आहे. तसेच संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व पात्र प्रशिक्षणार्थांना शासन निर्णयानुसार दरमहा ५००/- रुपये विद्यावेतन मिळणार आहे.तसेच संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम,स्मार्ट क्लास रूम,अद्यावर प्रसाधान गृहे,ग्रंथालय,अद्यावत वर्कशाँप, मशीनरी,हत्यारे व अवजारे उपलब्ध असुन या संधीचा ईच्छूक उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री.संतोष भगत यांनी केले आहे.
