पातूर: संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा पालखी सोहळा ७ जून रोजी भागवत एकादशी निमित्ताने पातूर नगरीत
टाळमृदंगाच्या गजरात दाखल होणार आहे. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की पालखी मार्गावर प्रचंड प्रमाणात घाण साचली असून दुतर्फा बाजूने प्रचंड प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत . प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पालखी मार्गाची स्वच्छता व अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले नाही. त्यामुळे भक्तामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे या गंभीर बाबीकडे तहसीलदार, गटविकास अधिकारी, व शिरला ग्रामपंचायत यांनी लक्ष देणे गरजेचे होते . स्वच्छतेबाबत शिरला सरपंच अर्चना शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आठ दिवसा अगोदर सचिवांना याबाबत अवगत केल्याचे कळविले.
पालखी सोहळ्याची सुरुवात बाबुळगाव, देऊळगाव मार्गे दुपारी पातुर येथे येईल. बी ए एम एस कॉलेज, बाळापुर रोड मार्गे,
छत्रपती संभाजी महाराज चौक, मिलिंद ,पोलिस स्टेशन चौक येथून सरळ पंचायत समिती कार्यालया येथे पालखी मुक्कामी राहणार आहे पालखी मार्गावर प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असून रोडला लागून लहान मोठे दुकाने लागली असल्याने पालखी मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे या गंभीर बाबीकडे अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे
