पातुर शहरात गेल्या अनेक महिन्यापासून पातुर शहराचा विद्युत पुरवठा हा वारंवार खंडित होतो याबाबत विद्युत मंडळाकडून कोणते प्रकारची योग्य दखल घेतल्या जात नाही. विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद असतात . येथील पातुर शहर व ग्रामीण भाग या विभागाचे अभियंता हे निष्क्रिय झाल्याने नागरिकांना अतोनात त्रास करावा लागतो पाऊस नसताना वारंवार विद्युत पुरवठा हा खंडित होतो पातूर वाशी या विद्युत मंडळाला पूर्णता कंटाळले. याला आळा घालण्याकरिता प्रथमच पातुर शहरातील शिवसेना उभाटा गटाचे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर यांनी दिनांक 12 जून रोजी विद्युत उपविभागीय कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले यावेळी युवा सेनेच्या वतीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच विद्युत पुरवठा खंडित करण्याअगोदर मोबाईलवर एसएमएस करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनामध्ये युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर , गजानन शिंदे, महेश शिंदे, राहुल देशमुख, राहुल गवई, विशाल सोनवणे,आकाश राऊत ,छोटू ठाकरे, प्रवीण मधुकर पोहरे ,कार्तिक काळपांडे, निखिल बारताशे, विकी पाटील ,आकाश इंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करून यावेळी निवेदन दिले

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}