पातुर प्रतिनिधी २३/६/२०२५
पातूर येथे 26 जून रोजी तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक सत्र 2025 – 26 ची सुरुवात अतिशय थाटामाटात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.आतुरली गुलाबपुष्पे स्वागत करण्या तुमचे.. मुलांनो तुम्हीच आहात भविष्य देशाचे! असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विजयसिंह गहीलोत माजी प्राचार्य तथा व्यवस्थापक बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर यांनी केले. जीवनात यशाच्या मार्गावर निरंतरता आणि सहिष्णुता असल्याशिवाय तुम्ही त्या मार्गावर चालू शकणार नाही आणि ध्येय गाठता येणार नाही असेही त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये मुलांना बोधपर सांगितले.नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रशिक्षणानंतर अतिशय आत्मविश्वासाने 2025 26 च्या शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एनसीसीच्या 100 कॅरेट्सनि मानवंदनात देत त्यांचे प्राणांगणात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे सुद्धा स्वागत एनसीसीच्या तुकडीने परेड मार्च करून केले.
कार्यक्रमादरम्यन विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन व नवीन पुस्तके वाटप करून त्यांचे स्वागत केले.भारत माता की जय,वंदे मातरम आणि इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला या जयघोषाने तुळसाबाई कावल विद्यालयाचा परिसर एनसीसीच्या कॅडेट्सनी दुमदुमून टाकला.ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प तामिळनाडू येथे दोन एनसीसी कॅडेट्सनी उन्हाळ्यामध्ये प्रशिक्षण घेतले व ते यशस्वीरित्या पूर्ण केले अशा सार्जंट पूनम अवचार व कॅडेट ऋतुजा अमानकर यांचे सुद्धा प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले. वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी करिता सुलभक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री सी आर साळुंखे सर यांचे सुद्धा स्वागत कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री विजयसिंह गहिलोत यांच्या हस्ते करण्यात आले.नवीन प्रवेश घेतलेल्या प्राची माने कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले”की या मोठ्या अशा शाळेमध्ये शिकताना आम्हाला खूप ज्ञान मिळेल व खेळाच्या मैदानावरती चांगला सराव करून आम्ही शाळेची मान राष्ट्रीय पातळीवरती झळकवू असे खंबीरपणे मत व्यक्त केले.” तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या या प्रवेशोत्सव प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री विजयसिंह गहीलोत व्यवस्थापक, सौ स्नेहप्रभादेवी गहिलोत, सचिव बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर, विद्यालयाचे प्राचार्य श्री अंशुमान सिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, उप मुख्याध्यापिका आर एस ढेंगे,पर्यवेक्षिका पी एम कारस्कर, पर्यवेक्षक एस आर मुखाडे व मोठ्या संख्येने पालक वर्ग सुद्धा उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे व आभार प्रदर्शन प्रा. पंकज वाकोडे सर यांनी केले.