अकोला एसीबीच्या कारवाईत तहसील कर्मचारी
पातूर प्रतिनिधी :- अकोला जिल्ह्यातील पातूर चे नायब तहसीलदार बळीराम चव्हाण गेल्या एकाच महिन्यात दोन अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्हे दाखल करून बऱ्याच लोकांना कारागृहात टाकणाऱ्या पातूरच्या नायब तहसीलदार बळीराम चव्हाणला लाचखोरीच्या प्रकरणांत अकोला एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने अकोला एसीबीला दिलेल्या तक्रारीनुसार शेतातील कायम खुणा करून देण्यासाठी नायब तहसीलदार बळीराम चव्हाण याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या थोड्याशा शेतजमिनीत मेहनत करून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्याला ४००० रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
मात्र पैशांची व्यवस्था करू शकत नसल्याने संबंधित शेतकऱ्याने अकोला एसीबीला ह्याबाबत तक्रार दिली होती.त्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता सत्यता आढळून आल्याने आज अकोला एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडण्याचे ठरविले होते.परंतु संबंधिताला काहीतरी संशय आल्याने त्याने ही लाच रक्कम स्वीकारली नाही.त्यामुळे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ह्या नायब तहसीलदाराला लाच मागणीच्या आरोपाखाली अटक केली असून त्याच्यावर पातूर पोलिस स्टेशनला लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ह्याच नायब तहसीलदाराने गेल्या महिन्यात पातूर तहसीलामध्येच कार्यरत तलाठी सबनीस व प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख यांचेसह इतर काही लोकांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल पातूर पोलिस स्टेशनला तक्रार देवून गुन्हे दाखल केले आहेत.एका प्रकरणात आरोपींना अटक होऊन आज ते जामीनावर मुक्त झालेले आहेत.तर दुसऱ्या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक व्हायची आहे.
ह्याच लाच मागणीच्या प्रकरणांत अजून एक आरोपी असून तो सध्यातरी फरार झालेला आहे.लाचखोर आरोपी बळीराम चव्हाणला एसीबीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर पातूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
सदरहू कारवाई अकोला एसीबीचे उप अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार दिगंबर जाधव,राहुल इंगळे,अभय बावस्कर,संदिप ताले, किशोर पवार, निलेश शेगोकार,असलम शहा,चालक नफीस यांनी पार पाडली.