पातुर प्रतिनिधी:- 20 जून रोजी सकाळी पातुर तहसीलदार यांनी वनदेव पांगरताटी येथे गुप्त माहिती हून बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेला शेख अफजल शेख निसार यांच्याकडे सुमारे ५.९० क्विंटल (सुमारे १२ चुमड्या) तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन चान्नी येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा.तहसीलदार पातूर यांच्या अध्यक्षतेखाली प्र. निरीक्षण अधिकारी विनीत ताळे,प्रमोद घोगरे व पराग खंडारे यांनी यशस्वीपणे पार पाडली.परंतु अद्याप पर्यंत मोठ्या गुन्हेगारावर कारवाई करण्यात आली नाही पातुर तालुका हे रेशनमाफीयाचा मोठे केंद्रबिंदू असून या रेशन माफियाचे अनेक लहान लहान दलाल हे प्रत्येक गावात तांदूळ खरेदी करून पातुर येथील एका राजकीय सहवास असलेल्या टोळीला विकत असतात.बाळापुर,बार्शीटाकळी व पातुर या तीन तालुक्याचे रेशन माफियांचा केंद्रबिंदू पातुर शहरातील परिसरात असून रेशनची विक्री परप्रांतात करण्यात येत असल्याचे माहिती समोर येत आहे.

या टोळीचे पोलीस विभागाच्या व महसूल विभागाचे अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही
पुरवठा नागरिकांनाही विभागाने खुल्या बाजारात धान्य न विकण्याचे आवाहन केले आहे.कुणी जाणीवपूर्वक रेशनचे धान्य बाहेर विकत असल्याचे आढळून आल्यास त्याचे कार्ड रद्द करण्याबाबत पुरवठा विभाग गांभीर्याने विचार करत आहे
शासनाने तीन महिन्याचे रेशन एकाच वेळी वाटप केल्याने मोठ्या प्रमाणात या रेशन तांदुळाची अवैध खरेदी गावागावात चालू आहे मां.पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, मा.अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे,सा.मा.सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल साहेब यांचा मार्गदर्शनात गुन्हेगारावर वचक बसावा याकरिता चालवीत असलेल्या प्रहार अभियान पथकाचे जिल्ह्यातील अनेक अवैध धंद्यावर कारवाई चालू असून पातुर शहराकडे दुर्लक्ष का ? असा मोठा प्रश्न पडला आहे ?