पातूर : विदर्भ कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित ३९ व्या विदर्भ केसरी कुमार मुले व मुली कुस्ती स्पर्धा निवड चाचणी नुकतीच अकोला येथे पार पडली.प्रभात किड्स येथे पार पडलेल्या या निवड चाचणीत पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून बाजी मारली आहे.३५ किलो वाजनगटातून इयत्ता आठवीचा विद्यार्थी रुद्र परमाळे, तर ३६ किलो वजन गटातून इयत्ता सातवीची विद्यार्थिनीं सोनल ठाकरे या दोन विद्यार्थ्यांनी अकोला जिल्ह्यातून बाजी मारत १४ वर्षा आतील या वजन गटातून पहिल्यांदा पातूर तालुक्याला हा बहुमान मिळाला आहे.पुसद येथे होणाऱ्या विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पातूरचे हे दोन विद्यार्थी वजन गटातून अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.यावेळी विदर्भ कुस्तीगीर संघांचे जिल्हाध्यक्ष चंदूदादा सिरसाट,सचिव विदर्भ केसरी युवराज गावंडे,प्रभात किड्स चे संचालक डॉ.गजानन नारे,विदर्भ कुस्तीगीर संघांचे अनिल कांबळे, सौरभ सिरसाट,भोजरासिंह बायस यांनी विजयी स्पर्धेकांचा सत्कार केला.पातूरच्या विजयी झालेल्या या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी दोन विद्यार्थ्याचा सत्कार केला.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे क्रीडा शिक्षक अक्षय तायडे यांचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, नितु ढोणे, संकल्प व्यवहारे,हरिष सौंदळे,बजरंज भुजबटराव,अविनाश पाटील, अक्षय तायडे, प्रतीक्षा भारसाकळे,प्रियंका चव्हाण, पूजा खंडारे,रेश्मा शेंडे,इकरा आदिबा खान,साक्षी वानखडे, शुभांगी बोरकर,दीपाली घोरे,दिव्या गव्हाळे, नयना पटोणे, प्रिया चक्रे,रुपाली पोहरे,कल्पना वानेरे,सुकेशिनी वाहूरवाघ, शुभम पोहरे,मधुकर बोदडे आदींनी परिश्रम घेतले.
