पातूरच्या किड्स पॅराडाईजचा अभिनव उपक्रम
पातूर : पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अगदी खऱ्याखुऱ्या दिमाखदार दीक्षांत समारोहाचा अनुभव घेतला. तीन वर्षाचे प्री- प्रायमरी शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या दीक्षांत समारोहाचे अध्यक्ष महापारेषांचे अधीक्षक अभियंता संजय काटकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पातूरचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड, डॉ एच एन सिन्हा कॉलेजचे प्राचार्य डॉ किरण खंडारे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ ज्योत्स्ना गाडगे व्यासपीठावर उपस्थित होते.प्रास्ताविक गोपाल गाडगे यांनी केले तर प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. किरण खंडारे, हनुमंत डोपेवाड यांनी मार्गदर्शन केले. समारोहचे अध्यक्ष अधीक्षक अभियंता संजय काटकर यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबतच दैनंदिन जीवनात शिस्त महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे हस्ते सिनियर के जी च्या विद्यार्थ्यांना डिग्री देऊन सन्मानित करण्यात आले. समारोहचे संचालन इकरा अदिबाआलीयर खान यांनी केले. यावेळी प्री -प्रायमरी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नीतू ढोणे, संकल्प व्यवहारे,नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, हरीष सौंदळे, रविकिरण अवचार, पंकज आवचार, प्रतीक्षा भारसाकळे , शितल गुजर, ऋतुजा अवचार, नेहा उपर्वट, नयना हाडके, स्वाती वालोकार,प्रियंका चव्हाण, पुजा खंडारे, प्रचाली थोराईत , रेश्मा शेंडे, इकरा अदिबा आलियार खान, योगिता शर्मा, अक्षय तायडे, नयना पटोले, रूपाली पोहरे, कल्पना वानेरे, शुभम पोहरे, मधुकर बोदडे यांनी परिश्रम घेतले.
या विद्यार्थ्यांना केली डिग्री प्रदान
अधिज्ञा निखिल भिंगे, अनन्या निलेश गाडगे, आराध्या गणेश उंबरकार, देवांशी संतोष लसनकार, मानवी ईश्वर जाधव, श्रावणी विशाल चवरे,श्रावी सिद्धार्थ मोरे,वैदही शुभम चव्हाण, सानवी युवराज चव्हाण, अथर्व अमोल अरबाड, अनय नितीन गणेशे, आर्यन नंदकिशोर घुगे, अर्थ बिपिन पवार, देवांश युवराज मानमोडे, ईश्वर गजानन पुंडकर, गोविंद चक्रधर बोडखे, मानस गणेश शेंडे, रिदान हरीश टप्पे,रुद्र धनंजय उगले,रुद्र सचिन निमकाळे, शिवम रवींद्र भगत, श्रेयश नितीन इंगळे,श्रीतेज मंगेश राऊत, समरजीत रंजीत जाधव, सोहम विजय फुलारी, तनय सदानंद सावत, वेदांत प्रदीप राठोड, वेदांत सतीश राठोड, विहान जयेंद्र बोरकर, हर्ष गोपाल शिंदे, दक्ष आशिष जाधव, राजवीर अतीश राठोड.
Box
शिस्तप्रिय विद्यार्थीच देशाचे उज्वल भविष्य – संजय काटकर
विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिस्त महत्त्वाची आहे तिकीट दैनंदिन जीवनातील शिस्त सुद्धा महत्त्वाची आहे. आणि ही जबाबदारी पालकांनी आजच्या या युगात घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या या काळात पालकांनी स्वतः गुंतून न राहता पाल्याच्या शिस्तीकडे सुद्धा लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे कारण त्यामधूनच उद्याच्या देशाचे उज्वल भविष्य दडलेले आहे, प्रतिपादन अधीक्षक अभियंता संजय काटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
चिमुकल्यांचा आत्मविश्वास वाढविणारा उपक्रम : डॉ. किरण खंडारे
महाविद्यालयीन जीवनात पदवीत्वर नंतरच दीक्षांत समारंभ अनुभवायला मिळतो, मात्र प्राथमिक शिक्षणापूर्वीच दीक्षांत समारंभाचा अनुभव चिमुकल्या विद्यार्थ्यांना मिळत आहे. असे अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपक्रमशील दर्जेदार शिक्षणप्रणालीचे दालन म्हणजे किड्स पॅरेडाइज स्कूलचे नाव घ्यावे लागेल. असे मनोगत प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांनी केले.
विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करणारे किड्स पॅरेडाइजचे उपक्रम : ठाणेदार हनुमंत डोपेवाड
आजच्या सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थ्यांना शिकवण्या सोबतच घडवणे ही मोठी जबाबदारी शाळा आणि पालकांवर येऊन ठेपली आहे, आपल्या आजूबाजूच्या परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणाऱ्या घटनांचा तपशील बघितल्यावर पालकांनी अधिक दक्ष होणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात विद्यार्थी घडवण्यासाठी असे उपक्रम महत्वाची बाब आहे, किड्स पॅराडाईचे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांना सक्षमतेचे धडे मिळवणारे असतात असे प्रतिपादन पातूरचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांनी यावेळी केले.
====
विद्यार्थी घडवणे हेच हिट्स पॅराडाइजचे ध्येय : गोपाल गाडगे
विद्यार्थ्यांना नुसतं पुस्तकी ज्ञान शिकवणे म्हणजेच शिक्षण नाही ही व्याख्या अधिक व्यापक करीत विद्यार्थी सर्वांगीण घडावा आणि तो अशा विविध उपक्रमांमधून घडत असतो,त्याचा आत्मविश्वास वाढत असतो असाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा वसा घेऊन किड्स पॅराडाईज काम करीत असल्याचे प्रतिपादन शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी आपल्या प्रास्ताविकतेमधून कार्यक्रमाची रूपरेषा व भूमिका मांडली.