आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांनी अकोला जिल्हयातील अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभट्टीवर दारू तयार करून विक्री करणा-यां आरोपीतांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करण्यात आली
दिनांक १३/०४/२०२४ रोजी पो.स्टे. चान्नी हद्दीमध्ये ग्राम सस्ती शिवार निर्गुना नदी पात्र येथे धाड टाकली असता आरोपी नामे नतीन मोतीराम अंभोरे वय ३० वर्ष रा. ग्राम सस्ती ता. पातुर जि. अकोला याचे जवळुन ७५ लिटर गावठी हातभट्टीची दारू व सड़वा मोहमाच ४२० लिटर व ईतर साहित्य असा एकुण ४९,५००/रू वा मुद्देमाल जप्त करून आरोपी मुद्देमालसह पुढील कायदेशीर कारवाई करिता पो.स्टे. चान्नी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरवी कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा., मा.अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. आशिष शिंदे व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, प्रमोद ढोरे, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, रवि खंडारे, सुलतान पठाण, महेद्रं मलिये, विशाल मोरे, खुशाल नेमाडे, अविनाश पाचपोर, वसिमोद्दीन, एजाज अहेमद, अनिल राठोड, लिलाधर खंडारे, धिरज वानखडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद अमीर, अशोक सोनवणे व चालक पो. अंमलदार अक्षय बोबडे, प्रशांत कमलाकर, विजय कबले यांनी केली आहे.
