नाफेड एनसीसीएफ व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते या चर्चासत्राचे उद्घाटन माननीय गृहमंत्री भारत सरकार श्री अमित शहाजी यांच्या हस्ते दिनांक चार जानेवारी 2024 ला विज्ञान भवन दिल्ली येथे करण्यात आले होते यावेळेस अकोला जिल्ह्यातून श्री अक्षय सुभाष जी जैन यांना अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून मा. ना. श्री अर्जुन जी मुंडा जी कृषिमंत्री एवम विशेष जनजाती मंत्री भारत सरकार, श्री अश्विनी कुमार चौबे केंद्रीय खाद्य मंत्री भारत सरकार, श्री बी एल वर्मा जी सहकार राज्यमंत्री भारत सरकार यांची उपस्थिती होती.
केंद्रीय राज्यमंत्री श्री अमित शहा जी यांच्या हस्ते तूर डाळ उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी खरेदी आणि पेमेंट साठी पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले होते यावेळेस माननीय केंद्रीय गृहमंत्री यांनी डाळ आयात मुक्त करण्यासाठी व आत्मनिर्भर करण्यासाठी बाजारभावाने खरेदीच्या घोषणा केली तसेच येणाऱ्या तीन वर्षात भारतात एकही किलो दाळ आयात होणार नाही अशी ग्वाही दिली तसेच पॅक्स द्वारा नवीन सोसायटीची उभारणी करण्यासंदर्भात नवीन धोरण आखण्यात आले यावेळेस श्री अक्षय ची सुभाष जी जैन यांनी मंचावर जाऊन माननीय गृहमंत्र्यांचा शाल श्रीफळ व ग्रामगीता देऊन संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार केला व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता गृहमंत्री जी करीत असलेल्या कामाबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने माननीय श्री अक्षय जी जैन यांनी त्यांचे आभार मानले तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाव वाढी संदर्भात योग्य निर्णय घेण्याची विनंती सुद्धा केली. ग्रामीण भागातून माननीय गृहमंत्री व सहकार मंत्री यांचा सत्कार करण्याचा व भेट घेण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल श्री अक्षय सुभाष जी जैन यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे त्यांनी आपल्या या उपलब्धीचे श्रेय आपल्या आई वडील भाऊ व या भागातील सर्व शेतकऱ्यांना दिले आहे त्यांच्या या विशेष उपलब्धी बद्दल नूतन विद्यालय प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट रसिकलाल धारीवाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था व आदर्श गोसेवांच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
