पातुर प्रतिनिधी:-प्राप्त माहितीनुसार,पातूर येथील शेतकरी शेख रफीक शेख चांद यांच्या अमराई पातूर परिसरातील शेतात हायब्रीड पिकांमध्ये अनेक दिवसांपासून एक पांढऱ्या रंगाची गाय फिरताना दिसली.त्यानंतर शेतकरी शेख रफीक शेख चांद यांनी तिला शेताबाहेर हुसकावून लावले. मात्र,तीच गाय पुन्हा त्यांच्या शेतात आली.शेतकऱ्यांना वाटले की,शेत परिसरात बेवारस फिरणाऱ्या या गायीला कोणीही इजा करू नये,म्हणून त्यांनी तिला सुरक्षितरित्या आपल्या शेतातच बांधून ठेवले आणि परिसरातील इतर शेतकरी व संबंधित व्यक्तींना याबाबत माहिती दिली.मात्र,सर्वांनीच ही गाय आपली नसल्याचे सांगितले.यानंतर शेख रफीक शेख चांद यांनी या घटनेची माहिती पत्रकार दूल्हे खान युसूफ खान यांना दिली. त्यानंतर,माणुसकीचा परिचय देत या दोघांनी पांढऱ्या रंगाच्या या गायीला पातूर पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केले.पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सत्यजित ठाकूर,संबोधित इंगळे आणि ज्ञानेश्वर चिकटे यांच्या सहकार्याने या गायीला सुरक्षितपणे पातूर वनराई गौशाळा बहुउद्देशीय संस्थेत पाठवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार,पातूर येथील शेतकरी शेख रफीक शेख चांद यांच्या अमराई पातूर परिसरातील शेतात हायब्रीड पिकांमध्ये अनेक दिवसांपासून एक पांढऱ्या रंगाची गाय फिरताना दिसली.त्यानंतर शेतकरी शेख रफीक शेख चांद यांनी तिला शेताबाहेर हुसकावून लावले. मात्र,तीच गाय पुन्हा त्यांच्या शेतात आली.शेतकऱ्यांना वाटले की,शेत परिसरात बेवारस फिरणाऱ्या या गायीला कोणीही इजा करू नये,म्हणून त्यांनी तिला सुरक्षितरित्या आपल्या शेतातच बांधून ठेवले आणि परिसरातील इतर शेतकरी व संबंधित व्यक्तींना याबाबत माहिती दिली.मात्र, सर्वांनीच ही गाय आपली नसल्याचे सांगितले.यानंतर शेख रफीक यांनी या घटनेचे माहिती पत्रकार दुलेखन यांना दिली माणूस माणुसकीचा परिचय देत या दोघांनी पांढऱ्या रंगाच्या या गाईला पातुर पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केले.
पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सत्यजित ठाकूर, संबोधित इंगळे आणि ज्ञानेश्वर चिकटे यांच्या सहकार्याने या गायीला सुरक्षितपणे पातूर वनराई गौशाळा बहुउद्देशीय संस्थेत पाठवण्यात आले आहे.
